एम.व्ही.पी. समाजाचे

के. टी. एच. एम. महाविद्यालय

(के.आर.टी. कला, बी.एच. वाणिज्य, ए.एम. विज्ञान महाविद्यालय.)

MVP SAMAJ'S

K.T.H.M. COLLEGE, Nashik

(K.R.T. Arts, B.H. Commerce and A.M. Science College.)

" एनएएसी तर्फे युजीसी परामर्श योजनेमार्फत केटीएचएम महाविद्यालयाला मेंटरशिप जाहीर"

15/09/2019
 

राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेतर्फे नुकताच  यूजीसी परामर्श योजनेचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण देशातून  १६७ सर्वोच्च मानांकित विविध महाविद्यालये व विद्यापीठे यांना मेंटरशिप जाहीर करण्यात आली आहे.  यात देशातील मोजक्याच महाविद्यालयांपैकी के टी एच एम महाविद्यालय, नाशिक याचादेखील यात समावेश आहे. भारतात स्वातंत्र्यानंतरच्या काळात उच्च शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला गेला असून, उच्च शिक्षणक्षेत्रातील सुधारणेसाठी काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बरेच प्रयत्न केले गेले आहेत. परंतु तरीसुद्धा आपल्या देशातील बऱ्याच उच्च शिक्षण संस्था शिक्षणाचे मानक पूर्ण करू शकल्या नाहीत या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेतर्फे 'यूजीसी परामर्श योजना' सुरू करण्यात आली आहे. ज्या मार्फत परिषद उच्चशिक्षणात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवण्यात अयशस्वी शैक्षणिक महाविद्यालये वा  संस्थांना मार्गदर्शन करणार आहे. यासाठी एनएएसी (राष्ट्रीय मूल्यांकन परिषद) देशातील सर्वोच्च मानांकित महाविद्यालये व विद्यापींठाच्या साहाय्याने  हे मार्गदर्शन करणार आहे. नुकतेच जाहीर झालेल्या परिपत्रकानुसार के टी एच एम महाविद्यालयास या योजनेनुसार मेंटरशिप (मार्गदर्शकत्व) प्रदान करण्यात आहे. ही संपूर्ण योजना  'हब अँन्ड स्पोक' (मार्गदर्शक संस्था व मार्गदर्शनाची आवश्यकता असणारी संस्था) या मॉडेलच्या माध्यमातून चालविली जाणार आहे. यासाठी या योजनेअंतर्गत केटीएचएम महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील सात महाविद्यालयांना मार्गदर्शन करणार आहे. एनएएसी कडून सुरू करण्यात आलेली ही 'यूजीसी परामर्श योजना' भारतातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमधील शिक्षणाची पातळी अधिक चांगली व्हावी आणि अशा परिस्थितीत इतर देशांपेक्षा भारतालाही उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण उच्च स्थान मिळावे अशी अपेक्षा आहे.

 

 
by -
 
 
Visitor Number:

Label Designed and Developed by - Computer Science Department